314 वा शिवराज्याभिषेक सोहळा आज रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.शिवराज्याभिषेक समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमास राज्याच्या विविध भागातून हजारो शिवप्रेमी रायगडावर उपस्थित आहेत.
शिवप्रेमींनी गुरूवारपासूनच रायगडावर गर्दी करायला सुरूवात केली होती.गुरूवारी गडपुजनाने कार्यक्रमास सुरूवात झाली.आज सकाळी साडेपाच वाजता ध्वजारोहणाने राज्याभिषेक दिनाची सुरूवात केली गेली.शाहिरी मुजरा,छत्रपतींच्या उत्सव मूर्तींवर छत्रपती घराण्याच्या राजपुरोहितांच्या मंत्रघोषात युवराज संभाजी महाराजांच्या हस्ते अभिषेक,तर मेघडंबरीवरील सिंहासनाधिष्ठीत शिवरायांच्या मूर्तींवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला.त्यानंतर राजसभा ते छत्रपतींच्या समाधीस्थळापर्यत शिवप्रतिमेची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत विविध ठिकाणांहून आलेली ठोलपथके सहभागी झाली होती..यावेळी जय शिवाजी,जय भवानी,छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या धोषणांनी आसंमंत दणाणून गेले होते.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं गडावर आणि परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.