— रायगडात यंदा 99 हजार 762 घरात बाप्पा ‘बसणार’

0
777

रायगड जिल्हयात यंदा 276 सार्वजनिक तर 99 हजार 762 खाजगी गणपतींची प्रतिष्ठापना होत आहे.याच काळात येणार्‍या गौरींची 14 हजार 647 घरांत प्रतिष्ठापना केली जाणार असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली.रायगड जिल्हयात दीड दिवस,पाच दिवस,सात दिवस आणि दहा दिवसांचे गणपती बसविले जातात.गणेशोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगड पोलिसांनी जय्यत तयारी केली असून स्वतः पोलीस अधीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक,सात उपविभागीय पोलीस अधिकारी 27 पोलीस निरिक्षक,144 पोलीस उपनिरिक्षक,आणि 1900 पोलीस तैनात कऱण्यात येत आहेत.पर जिल्हयातून 400 पोलीस,400 होमगार्डस आणि एसआरपीची एक कंपनी आणि शिघ्र कृती दलाची एक कंपनी रायगड जिल्हयासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here