रायगड जिल्हयात महिलांशी संबंधित गुन्हयात सातत्यानं वाढ होत असल्याचं वास्तव माध्यमांनी समोर आणल्यानंतर आता जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं आहे.शुक्रवारी जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी अलिबागेत झालेल्या सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती तसेच जिल्हा क्षती सहाय्य व पुनर्वसन समितीच्या बैठकीत कौटुंबिक हिसांचारापासून महिलांचं सरक्षण आणि मनोधैर्य – योजनेचा आढावा घेण्यात आला.महिलांच्या प्रश्नांबाबत समाजाचे प्रबोधन करण्यासाठी चर्चासत्र,मेळाव्याचं आयोजन करणे,महिलांसाठीच्या योजना आणि महिला अत्याचाराच्या संबंधिचे कायदे दृकश्राव्य माध्यमांव्दारे ग्रामस्थांपर्यत पोहचविणे,तसेच मतीमंद महिलांचे पुनर्वसन कऱण्यासाठी त्याची माहिती घेण्याचे बैठकीत नक्की कऱण्यात आले.
– रायगड जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात जानेवारी ते जून 2014 या सहा महिन्याच्या काळात बलात्काराचे 18 गुन्हे दाखल झाले आहेत,महिलांच्या विनयभंगाचे 60 गुन्हे नोंदविले गेले आहेत तर महिलांचे अपहरण,आणि कौटुंबिक हिसांचाराच्या संदर्भातल्या 23 गुन्हयांची नोंद जिल्हयातील विविध पोलिस ठाण्यात केली गेली आहे.रायगड जिल्हयात महिलांचे अपहरण किंवा महिलांना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकारही चिंता वाटावी एवढ्या प्रमाणात वाढले असून ज्या महिला मिसिंग आहेत त्यांच्या पैकी अनेकांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.पहिल्या सहा मिहन्याच्या तुलनेत गेल्या अडिच महिन्यात जिल्हयात महिलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये लक्षणिय वाढ झाल्याचे चित्र समोर आल्यानं हा विषय सार्वत्रिक चिंतेचा आणि चिंतनाचा बनला आहे.महिलांशी संबंधित गुन्हयांची आकडेवारी तपासली तर गेल्या नऊ महिन्यात दररोज सरासरी एका तरी महिलेवर विविध प्रकारचे अन्याय,अत्याचार झाल्याचे दिसून येते.अनेक प्रकरणात तक्रारच दाखल होत नसल्यानं या गुन्हयांची संख्या प्रत्यक्ष नोदविली गेली आहे त्यापेक्षा किती तरी पटिने अधिक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्यामुळं उ ग्र स्वरूपात समोर येत असलेली महिलांवरील अत्याचाराची समस्या सोडविण्यासाठी आता सामाजिक संघटनांनीच पुढाकार घेत जनजागृती कऱण्याची गरज आहे.