रायगड जिल्हयात सरासरी एवढा पाऊस झालेला नसला तरी वेळेवर पडत गेलेल्या पावसामुळे भातपीक उत्तम असून यंदाच्या हंगामात 31 लाख 84 हजार क्विंटल भाताचे उत्पादन होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केल्याने पर्जन्यराजा रूसला तरी बळीराजा हसला अशी शेतकर्यांची स्थिती होणार आहे.रायगड जिल्हयात 1 लाख 14 हजार हेक्टर क्षेत्रफळावर भातपिकाची तर नाचणी,वरी,तीळ यासारख्या पिकांची 10 हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.त्याबरोबरच मूग,चवळी,उडीद,यासारख्या पिकांचीही आंतरपीक म्हणून लागवड करण्यात आली आहे.भातपिकांमध्ये जया,कर्जत-3,कर्जत-5 रत्ना,सुवर्णा,इंद्रायणी,मसुरी,भोगावती या सुधारित बियाणांची अधिक पेरणी झाल्याने उत्पादनात वाढ होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.सध्या अनेक ठिकाणी कापणीला सुरूवात झाली असून हे काम दिवाळीपूर्वी पूर्ण होईल असा अंदाज आहे.
(Visited 197 time, 1 visit today)