मराठवाड्यातील मद्य उत्पादन करणार्या काऱखान्याचे पाणी पुरवठा बंद करावा की नको यावर राज्यभर वाद सुरू असतानाच एकटया रायगडच्या उत्पादन शुल्क विभागाने चालू वर्षात 635 कोटी 44 लाखांचा महसुल जमा केल्याचे समोर आले आहे.2014-15 या आर्थिक वर्षांच्या तुलनेत हा आकडा 159 कोटी 41 लाखांनी जास्त आहे.मद्य निर्मिती शुल्कात सातत्यानं वाढ होत गेल्याने मद्याच्या दरातही वाढ होत गेली तरीही मद्याच्या मागणीत मात्र घट झाल्याचे दिसत नाही.किंबहुना मागणी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.जिल्हाय मार्च 2015 ते एप्रिल 2016 या कालावधीत 3 कोटी 7 लाख लिटर मद्य आणि बिअरची विक्री झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून समोर आले आहे।