रायगडात जंगलं जळू लागली

0
879
रायगड जिल्हयात जंगलांना लावण्यात येत असलेल्या वणव्यांमुळे दरवर्षी शेकडो हेक्टर वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने पर्यावरणप्रेमीमंध्ये चिंतेचे वातावरण आहे.पावसाने पाठफिरविताच जिल्हयात वणव्यांचे सत्र सुरू झाले आहे.गेल्या आठ दिवसात मुरूड,श्रीवर्धनसह उत्तर रायगडमधील उऱण,पनवेलमध्येही जंगलांना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत.रविवारी रसायनी तसेच जेएनपीटीनजिकच्या परिसरातील गवताला लागलेल्या आगीत जएनपीटीने लावलेली अनेक वृक्ष जळून घाक झाली आहेत.मात्र दिवसा ढवळ्या वणवे लागत असतानाही त्यावर कोणाचे नियंत्रण नसल्याचे किंवा आगी लागू नयेत यासाठी परिणामकारक उपाययोजना होताना दिसत नाही.त्यामुळे वणव्यांची संख्या दरवर्षी वाढताना दिसते आहे.2011-12 मध्ये 152 वणवे लागले आणि त्यात 819 हेक्टर वनक्षेत्र जळाले.2012-13 मध्ये 202 वणव्यात 1171 हेक्टर,2013-14 मध्ये 91 वणव्यांमध्ये 410 हेक्टर,2014-15 मध्ये 876 हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले आहे.यातील बहुसंख्य वणवे मानवनिर्मित असून त्यावर नियंत्रण आणता येऊ शकते असा दावा पर्यावरण प्रेमी करताना दिसतात. —

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here