रायगडात कोसळतोय तुफानी पाऊस

0
885

धरणांची पातळी वाढली,
नद्या भरून वाहू लागल्या,

रायगड जिल्हयात गेली चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आता धरणसाठ्यात वाढ होत असून जिल्हयातील 28 लघु पाटबंधारे प्रकल्पांपैकी तीन धरणं शंभर टक्के भरली आहेत तर तीन धरणं पन्नास टक्कच्या वर भरली आहेत.उर्वरित धरणं 41.08 टक्के भरली आहेत.धरण भरल्याने म्हसळा तालुक्यातील पाभरे संदरी धरणातून 877.83 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.सततच्या पावसामुळे जिल्हयातील अंबा,कुंडलिका,सावित्री,गांधारी,पाताळगंगा,उल्हास,गाढी या नद्याची पातळी वाढली असून यातील काही नद्या तुथडी भरून वाहू लागल्या आहेत.समुद्रही खवळलेला असून आजही लाटा मोठ्या प्रमाणावर किनाऱ्यावर धडकत आहेत.गेल्या 24 तासात रायगडात सरासरी 100.54 मिली मिटर पाऊस झाला आहे.उरणला सर्वाधिक 160.7 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे.येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दरड कोसळण्याचा धोका असलेली गावं तसेच नदी आणि खाडी काठच्या गावांना सावधानेतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्हा नियंत्रण केंद्रही चोवीस तास सतर्क ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.सध्या रायगडमधील अलिबाग,मुरूड,नागोठणे,महाड,उरण,पेण सह संपूर्ण जिल्हयात जोरदार पाऊस कोसळत आङे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here