अलिबाग- रायगड जिल्हयातील चनेरा आणि रत्नागिरी जिल्हयातील लोटे परशुराम येथील औद्योगिक वसातीत केंद्र सरकारकडून दोन मोठे प्रकल्प सुरू करण्यात येणार असून त्यातून कोकणातील दहा हजार तरूणांना रोजगार मिळेल अशी माहिती केद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिली.
अलिबाग येथे काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी लोटे परशुराम येथे हिंदुस्थान पेपर कार्पोरेशनचा कागद निर्मिती प्रकल्प तर चणेरा येथे भारत हेवी लिमिटेडचा एक प्रकल्प उभारला जाणार आहे.त्यासाठी 2400एकर जागाचे संपादन करावे लागणार असल्याची माहितीही दिली.
रायगड जिल्हयातील पाच गावांमध्ये कचऱ्यापासून खत किंवा वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा मानसही अनंत गीते यांनी बोलून दाखविला.बहुप्रथिक्षित पेण- अलिबाग रेल्वे मार्गाच्या संदर्भात लवकरच आपण रेल्वे मंत्री सुरेस प्रभू यांची भेट घेणार आहोत.रेल्वे मंत्री कोकणातील असल्याने कोकणातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी काही पत्रकारांशी बोलताना व्यक्ते केल