रायगडात मोर्चे,निदर्शने 

0
949
अलिबाग-आरक्षणाच्या मुद्यावरून कालचा दिवस रायगडमध्ये ढवळून निघाला.पोलादपूर तालुक्यात काल धनगर समाजाच्यावतीने पोलादपूर तहसिलवर मोर्चा काढण्यात आला होता.धनगर समाजाला अनुसुचित जातीचे आरक्षण मिळावे अशी मागणी तहसिलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात केली गेली.यावेळी आरक्षण हक्क आहे,भिक नाही अशा घोषणा देण्यात आल्या.
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्यासाठी कर्जत येथील उपविभागीय कार्यालयावर खालापूर आदिवासी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्यावतीनं मोर्चा काढण्यात आला होता.उपविभागीय अधिकाऱ्यंाना देण्यात आलेल्या निवेदनात अनुसुचित जमातीच्या आरक्षणाला हात लावू नये अशी मागणी कऱण्यात आली.
विरशैव लिंगायत समाजातील लिंगायत वाणी व लिंगायत जातीसह उपजातींना ओबीसी आरक्षण द्यावे या मागणीसाठी लिंगायत समाजाच्यावतीने  पनवेल येथे आंदोलन कऱण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांनी मुंबई-पुणे महामार्गावर उग्र निदर्शने केली.जिल्हयाच्या विविध भागात केल्या गेलेल्या आंदोलनांचे पडसाद जिल्हयात उमटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here