रायगड जिल्हयातील 356 गावांना लावण्यात आलेला इको सेन्सेटीव्ह झोन उठवून ही गावही झोन मुक्त करावीत अशी मागणी आता गावकऱ्यांकडून केली जात आहे.रत्नागिरी जिल्हयातील 353 आणि सिंधुदुर्गमधील 333 गावं मिळून एकूण 986 गावं इको सेन्सेटीव्ह झोनमधून बगळण्याचा निर्णय केंद्र सरकारने दोन दिवसांपुर्वी जाहीर केला आहे.मात्र रायगड जिल्हयाला अपवाद केल्याने जिल्हयात नाराजी व्यक्त केली जात आहे.जिल्हयाच्या कर्जत,माणगाव,खालापूर,महाड,पोलादपूर,रोहा,सुधागड,या सात तालुक्यातील 356 गावांना इको सेन्सेटीव्ह झोन लावण्यात आल्याने या गाावातील विकासकामांवर परिणाम झाला आहे.घर बांधणी,वाळु उत्खनन आदिंवर नियंत्रण आले आहे.या बाबत रायगडचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना साकडे घालण्यात आले आहे.