किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या 520 कोटींच्या पॅकेज पैकी पहिल्या टप्प्यातील कामांसाठी 9 कोटी रूपयांचा निधी रायगड जिल्हाधिकार्यांना नुकताच प्राप्त झाला आहे.त्यामुळं रायगड किल्ल्याचे संवर्धन आणि सुशोभिकरणाच्या कामाचा लवकरच शुभारंभ होईल अशी शक्यता आहे.पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून किल्ले रायगडचे संवर्धन केले जाणार आहे.या निधीतून पर्यटकांच्या सोयी,सुरक्षा,राजमाता जिजाऊंचा वाडा ,जिजाऊंची समाधी आदि टिकाणच्या दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत किल्ल्याच्या सर्व कामासाठी 520 कोटी रूपये खर्च येणार आहे.–