रायगड जिल्हयात दरवर्षी साडेतीन ते चार हजार मिली मिटर पाऊस पडूनही एप्रिल-मे मध्ये जिल्हयाच्या अनेक भागात पाणी टंचाई जाणवते.दरवर्षी पाणी टंचाई निवाऱण्यासाठी सरकार कोटयवधी रूपये खर्च करीत असले तरी पाणी टंचाईचे हे दुर्भिक्ष्य कायमस्वरूपी दूर कऱण्यात सरकारला अद्याप यश आलेले नाही.जिल्हयात दरवर्षी शेकडो गावांना पाणी टंचाईचा फटका बसतो.यावर्षी मागच्या आठवडयात 35 गावं 155 वाड्या असे मिळून 190 गावं ,वाडयांना टॅंकरनं पाणी पुरवठा कऱण्यात येत होता.त्यामध्ये चालू आठवडयात आणखी भर पडून हा आकडा 213वर पोहोचला आहे.या गावांना पाणी पुरवठा कऱण्यासाठी दोन सरकारी आणि 24 खासगी टॅंकरचा वापर करण्यात येत आहे.पाणी टंचाईची सर्वाधिक झळ पेण तालुक्याला बसत असून तेथे 23 गावं आणि 53 वाडयांना टॅंकरनं पाणी पुरवठा करावा लागत आहे.पेण पाठोपाठ महाडला पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणवतं.तेथे एक गाव आणि 49 वाडया मिळून 50 ठिकाणी टॅंकरनं पाणी पुरविलं जातंय.पोलादपूरमध्ये 2 गावं आणि 45 वाडया आणि कर्जत तालुक्यात सहा गावं आणि तेरा वाडयांना टॅंकरनं पाणी पुरवठा केला जातोय.
रायगडजिल्हायातसावित्री,गांधारी,काळ,भोगावती,कुंडलिका,आंबा,बाळगंगा,पाताळगंगा,गाढी यासारख्या बारमाही वाहणाऱ्या नद्या असल्या तरी एक तर या नद्या कोरडया पडल्या आहेत किंवा त्या दूषित झालेल्या आहेत.जिल्हयातील बहुतेक धरणांनीही तळ गाठल्यानं पाणी पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.गावांना पाणी पुरवठा कऱणाऱ्या अनेक नळ पाणी पुरवठा योजनाही बंद पडल्याने पाणी टंचाईची तीव्रता वाढताना दिसते आहे.त्यामुळं आता साऱ्यांनाच पावसाची प्रतिक्षा आहे.