रायगड जिल्हयात एका बाजुला पाणी टंचाईची तीव्रता वाढत असतानाच कृषी विभाग आणि शेतकरी खरिपाच्या तयारीला लागले आङेत.जिल्हयात यंदा 1 लाख 23 हजार हेक्टरवर भाताची लागवड अपेक्षित असून त्यासाठी लागणारे बियाणे,खते,किटकनाशके,पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने जय्यत तयारी केली आहे.कृषी विभाग 17 हजार क्विटल बियाणे ,28 हजार मेट्रिक टन खते,28 हजार 300 किलो लिटर किटकनाशके उपलब्ध करून देणार आहेत.जिल्हयातील शेतकर्यांना 156 कोटी रूपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ठ आङे.यंदा भात उत्पादनाचे उद्दिष्टही वाढविण्यात आले आहे.गेल्या वर्षी प्रती हेक्टरी सरासरी 28.84 क्विटंल भाताचे उत्पादन घेण्यात आले .यंदा प्रती हेक्टरी 30 क्विंटल भात पीक घेण्याचे उद्ष्टि नक्की कऱण्यात आले आहे.दरम्यान शेतकर्यांनीही शेतीची कामे सुरू केली आहेत.मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने यांत्रिक अवजारांना यंदा मागणी वाढल्याचे चित्र आहे.-