सैराटच्या मार्गानं जात रायगड जिल्हयात गेल्या वर्षभऱात 133 जोडप्यांनी आंतरजातीय विविह केल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ठ दिसते.आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने जोडप्याला 50 हजार रूपयांची मदत दिली जाते.त्यानुसार जिल्हाय वर्षभरात 64 लाख 40 हजार रूपयांचे अनुदान अशा आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्याना दिले गेले आहे.पुर्वी ही रक्कम पन्नास हजार रूपये होती.आंतरजातीय विवाहांची जिल्हयात संख्या वाढत असली तरी पालकांचा मात्र अशा विवाहांना विरोध असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे पालकांसाठी समुपदेशन कक्ष सुरू करावा अशी मागणी आता होत आहे.-