यंदा कोकणात सरासरी पेक्षा 27.5 टक्के पाऊस अधिक होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केल्याने एका बाजुला आनंद व्यक्त केला जात असतानाच रायगड जिल्हयात तब्बल 26 वेळा समुद्राला मोठी भरती येणार असल्याची आणि या काळात 4.50 मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार असल्याचे वास्तव समोर आल्याने जिल्हयातील जनतेच्या मनात धडकीही भरली आहे.4 जून ते 20 सप्टेंबर या चार महिन्यात 26 वेळा समुद्राला मोठे उधाण येणार आहे.5 ते 7 जून हे तीन दिवस अधिक धोक्याचे असून या काळात 4.85मीटर,4.87 मीटर आणि 4.91 मीटर उंचीच्या लाटा किनार्यावर धडकणार असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने किनार्यावरील आणि खाडी काठच्या रहिवाश्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे .उरण ,पनवेल,पेण आणि श्रीवर्धन या किनार्यांवरील तालुक्यात 2,500 हेक्टरात भातशेती केली जात असून 500च्या जवळपास गावं असल्याने या लाटांचा मोठा तडाखा शेतीला आणि गावांना बसण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.,