महिलाचंा कौल निर्णायक 

0
811

रायगड लोकसभा मतदार संघात महिला मतदारांची मतदानाची टक्केवारी नेहमीच पुरूषांच्या तुलनेत कमी राहिलेली आहे मात्र यावेळेस जवळपास 65 टक्के महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजाऊन सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.महिला मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत आहेत ही स्वागतार्ह बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
रायगडमध्ये 64.68 टक्के एवढे विक्रमी मतदान झालेले असले तरी त्यातील महिला मतदारांची टक्केवारी 65 टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे.श्रीवर्धन,गुहागर,आणि दापोली या तीन विधानसभा मतदार संघात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात असतानाही पुरूषांपेक्षा 16884 अधिक महिला मतदारांनी मतदानाचा हक्का बजावल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे अपेक्षेप्रमाणं महिला मतदारांनी कोणाला कौल दिला आहे यावरूनच उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
रायगडमध्ये 15 लाख 29 हजार 728 एवढे मतदार आहेत.त्यापैकी 9लाख91 हजार142 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.यामध्ये अलिबाग विधानसभा मतदार संघात सर्वाधिक म्हणजे 67.81 टक्के मतदारांनी मतदान केले तर महाडमध्ये सर्वात कमी म्हणजे 62.03 टक्के मतदान झाले.2009 मध्ये 56 टक्के मतदान झाले होते.यावेळेस मतदानात 9 टक्क्याची वाढ झालेली आहे .गतवेळच्या तुलनेत यावेळेस सव्वादोन लाख अधिक मतदारांनी मतदान केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here