रायगड जिल्हयात वेळेत पेरणी योग्य पाऊस झाल्यानं खरीप पिकांच्या पेरणीच्या कामाला वेग आला असून आतापयर्ंत जिल्हयात भाताची ६१़ टक्के पेरणी पूणर् झाल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीनं देण्यात आली आहे.जिल्हयात १ लाख १५ हजार ९८ हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र असून त्यापैकी साठ हजार पंधरा हेक्टरवर भाताची लागवड झाली आहे.येत्या आठ दिवसात पेरणीची कामं पूणर् होतील असा विश्वास कृषी विभागाला आहे.नाचणीची पिकाची देखील ८०टक्के पेरणी पूणर् झाली आहेत.जिल्हयात ७ हजार ११४ हेक्टर क्षेत्रफळावर नाचणीचे पीक घेतले जाते.त्यापैकी ५हजार ६८ हेक्टर क्षेत्रफळावर नाचणीच्या पिकाची लागवड झाली आहे.जिल्हयात १२ जून पयर्त ५२९ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे.