रायगडमध्ये निवडणूक यंत्रणा सज्ज

0
872

अलिबाग दि.25:- (जिमाका) रविवार 27 नोव्हेंबर 2016 रोजी जिल्ह्यातील 9 नगरपालिकांच्या निवणुकीचे मतदान होणार असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

जिल्ह्यातील उरण, खोपोली,पेण, अलिबाग,मुरुड,रोहा,श्रीवर्धन, महाड, माथेरान या 9 नगरपालिकांसाठी निवडणुक होत आहे.  ही निवडणुक शांततेत पार  पडावी व मतदारांना निर्भयतेने मतदान करता यावे यासाठी जिल्हा प्रशासनासोबत पोलीस विभाग देखील सज्ज झाला आहे.  प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उमेदवार व प्रभाग

जिल्हयात होणाऱ्या 9 नगरपरिषदांच्या निवडणूकीसाठी एकूण 81 प्रभाग आहेत. यात 170 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.या 170 नगरसेवक पदासाठी एकूण 528 उमेदवार उभे आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे. उरण न.प. एकूण 9 प्रभाग, निवडून द्यायचे सदस्य 18 तर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या 61 . खोपोली न.प. एकूण 14 प्रभाग, निवडून द्यायचे सदस्य 29 तर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या 118 . पेण  न.प. एकूण 10 प्रभाग, निवडून द्यायचे सदस्य 21 तर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या 59 . अलिबाग न.प. एकूण 8 प्रभाग, निवडून द्यायचे सदस्य 17 तर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या 44 .  मुरुड-जंजिरा न.प. एकूण 8 प्रभाग, निवडून द्यायचे सदस्य 17 तर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या 52 . रोहा  न.प. एकूण  8 प्रभाग, निवडून द्यायचे सदस्य 17 तर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या 59 . श्रीवर्धन न.प. एकूण 8 प्रभाग, निवडून द्यायचे सदस्य 17 तर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या 47 . महाड  न.प. एकूण 8 प्रभाग, निवडून द्यायचे सदस्य 17 तर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या 42 . माथेरान  न.प. एकूण 8 प्रभाग, निवडून द्यायचे सदस्य 17 तर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या 46 .तर नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक होत असून या 9 नगरपरिषदांसाठी 41 उमेदवार उभे आहेत. यात उरण-4, खोपोली-7,पेण-5, अलिबाग-4, मुरुड-जंजिरा-4, रोहा-7, श्रीवर्धन-3, महाड-3 आणि माथेरान-4 असे उमेदवार आहेत.

मतदार संख्या व मतदान केंद्र

या 9 नगरपरिषदांच्या निवडणूकीसाठी पात्र मतदार, पुरुष 93,342, महिला-91,128 असे एकूण 1 लाख 85 हजार 170 मतदार आहेत. त्यांची नगरपरिषद निहाय माहिती पुढील प्रमाणे- खोपोली-पुरुष 27489, महिला-24989, उरण-पुरुष 11947,महिला-11687, माथेरान-पुरुष 1734,महिला-1763,पेण-पुरुष 15421,महिला-16617, अलिबाग-पुरुष 8232,महिला-8011, मुरुड-पुरुष 5218,महिला-4984, रोहा-पुरुष 7716,महिला-7627, महाड-पुरुष 10107,महिला-9900, श्रीवर्धन पुरुष 5478,महिला-5550, तसेच टपाल मतपत्रिकांची एकूण संख्या 4763 आहे. यात अलिबाग-340, पेण-1550,खोपोली-925, माथेरान-180, महाड-200, मुरुड-400, रोहा-158, उरण-640, श्रीवर्धन-370 अशी आहे.

या  9 नगरपालिकांच्या निवडणूकीसाठी  257 मतदान केंद्र असून त्याची नगरपालिका निहाय संख्या पुढील प्रमाणे आहे. अलिबाग- 22, पेण-42,खोपोली-70, माथेरान-8, महाड-27, मुरुड-16, रोहा-22, उरण-33, श्रीवर्धन-17 अशी आहे. या 257 मतदान केंद्रांवर  प्रत्येकी 6 प्रमाणे 1306 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  या कर्मचाऱ्यांची तसेच मतदान यंत्राची ने-आण करण्यासाठी  वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून ते    26 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावर पाठविण्यात येतील.

 या 9 नगर पालिकांसाठी असलेल्या सर्व  मतदानयंत्राची तपासणी करण्यात आली आहे.   उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्रे सीलबंद करण्यात आली आहेत.  मतदान यंत्रामध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  27  नोव्हेंबरला प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवाराच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत मतदानयंत्रे सुरु करण्यात येतील.  मतदान प्रक्रिया संपल्यानंतरही या प्रतिनिधीच्या उपस्थितीत पुन्हा मतदानयंत्रे सीलबंद करण्यात येणार आहे.

            या नगरपालिका हद्दीतील सर्व  पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, निर्भयतेने मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

0000

2 Attachments

Click here to Reply, Reply to all, or Forward

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here