रायगड जिल्हयात मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारी दुपारनंतर विश्रांती घेतली होती पण बुधवारी रात्री जिल्हयाच्या विविध भागात पावसाला पुन्हा सुरूवात झाली. काल रात्री पासून जिल्हयात सर्वत्र चांगला पाऊस कोसळत असल्याने कोमेजलेल्या भात रोपांना या पावसाने जिवदान मिळेल असे शेतकऱ्यांना वाटते. जिल्हयात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी 30.6 मिली मिटर पाऊस झाला असून सर्वाधिक 64.0 मिलीमिटर पाऊस अलिबागला झाला आहे तर खालापूरला सर्वात कमी 5.1 मिली मिटर पाऊस खालापूरला झाला आहे.पेण,उरण,कर्जतलाही पाऊस झाला आहे,मात्र महाड,पोलादपूर,म्हसळा या दक्षिण रायगडच्या तालुक्यात पावसाचा जोर कमी आहे.