अलिबागः रायगड जिल्हयातील 121 ग्रामपंचायतीसाठी उद्या दिनांक 26 रोजी मतदान होत असून 27 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत.लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका होत असल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत.काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता.त्यामुळं प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या असल्या तरी उमेदवार थेट भेटी-गाठींवर भर देताना दिसत आहेत.अलिबाग तालुक्यातील कुरूळ येथील निवडणूक शेकापनं प्रतिष्ठेची केली आहे.सातिर्जे ही कॉग्रेसच्या ताब्यातील ग्रामपंचायत ताब्यात घेणसाठी शेकापचे प्रयत्न आहेत.काल सातिर्जे गावात स्लिप वाटपावरून शेकाप आणि कॉग्रेस कार्यकर्त्यामध्ये मारामारी झाली.त्यात चारजण जखमी झाले आहेत..