शेतकरी कामगार पक्षाने रायगड आणि मावळ मतदार संघासाठी आपले उमेदवार जाहीर केले असून रायगडमधून चिपळूण येथील रमेश कदम आणि मावळमधून लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे.पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आज ही घोषणा केली.विशेष म्हणजे रमेश कदम आणि लक्ष्मण जगताप हे दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीची पार्श्वभूमी असलेले आहेत.2009च्या निवडणुकीत शेकापने मावळ आणि रायगडमध्ये शिवसेनेला पाठिंबा दिला होता आणि दोन्ही ठिकाणी सेनेचे उमेदवार विजयी झाले होते.
शेतकरी कामगार पक्षाची जाहीर सभा सध्या रायगड जिल्हयातील पेण येथे सुरू आहे.या सभेत जयंत पाटील यांनी वरील दोनही उमेदवारांची घोषणा करताना शिवसेनेबरोबरच्या पाच वर्षांच्या जुन्या युतीलाही पूर्ण विरााम दिला आहे.रायगड जिल्हा परिषदेत शेकाप आणि शिवसेनेची युती सत्तेत असून तेथील युतीही आता संपुष्टात येईल अशी शक्यता आहे.जिल्हा परिषदेतील युती तुटल्यानंतर तेथेही नवी समीकरणे जन्मास येण्याची चर्चा व्यक्त केली जात आहे.शेकापच्या या भूमिकेमुळे रायगडात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे,शिवसेनेचे अनंत गीते आणि शेकापचे रमेश कदम यांच्यात लढत होत असून मावळमध्ये शेकाप विरूध्द शिवसना अशीच लढत होईल