पाच किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करम्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असल्याने रायगड जिल्हयातील पहिली ते सातवी पर्यंतच्या तब्बल 248 शाळांना कुलुप लागणार आहे.बंद होणार्या शाळांमधील विद्यार्थ्यांना नजिकच्या शाळांमध्ये स्थलांतरीत केले जाणार असल्याने पालक वर्गात खळबळ उडाली आहे.या निर्णयाचा सर्वाधिक फटका महाड तालुक्याला बसणार असून तेथील 56 शाळा बंद होणार आहेत.जिल्हयात इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून प्रवेश घेण्याकडेच पालकांचा कल असल्याने मराठी माध्यमांच्या शाळांना घरघर लागल्याचे चित्र आहे. बंद होणार्या शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न कसा सोडविला जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे,