स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात हरित क्रातीचे स्वप्न पाहिले,मात्र ही हरित क्रांती खरोखरीच दृष्टीपथात आहे काय असा प्रश्न आजच्या कृषी दिनाच्या निमित्तानं रायगडमध्ये विचारला जात आहे.कधी काळी रायगड जिल्हा भाताचे कोठार होता.पण आज ती स्थिती राहिलेली नाही.कारण जिल्हयात मोठ मोठे प्रकल्प आले आणि सुपिक जमिनीवर मोठ मोठ्या वसाहती उभ्या राहिल्याने जिल्हयातील लागवडीखालील जमिनीचे क्षेत्रफळ कमी झाले आहे.जिल्हयात लागवडी खालील क्षेत्रफ़ळ अवघे 4 लाख हेक्टर एवढेच उरले असून त्यातील केवळ 1 लाख 24 हेक्टरवर भाताचे पीक घेतले जाते.तर उर्वरित क्षेत्रफ़ळावर कडधान्य घेतले जातात.मात्र बदलते हवामानाचा आणि शेतीसाठीच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने शेतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे शेतकरी सांगतात.जिल्हयात यंदा पाऊस पडलेला नाही,त्यामुळे भाताची रापे वाचविण्यासाठी टॅन्करने पाणी आणून शेतील द्यावे लागत आहे अशी वेळ गेल्या पन्नास वर्षात कधीच आली नव्हती असे वृध्द शेतकरी सांगतात.याचा फटका यंदा खरिप हंगामाला बसणार असून शेतकरी शेतीपासून अधिक दूर जाणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.