रायगड जिल्हयात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याने राष्ट्रवादीला जिल्हयातील सात पैकी चार मतदार संघ हवे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रधेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे.
माणगाव येथे पक्षाच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हे मत मांडले. या कार्यक्रमास अजित पवार उपस्थित होते.सध्या जिल्हयातील तीन विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे तर चार मतदार संघ कॉग्रेसकडे आहेत.जिल्हयात सध्या राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत.
अजित पवार यांनी आपल्या भाषणात लोकसभा निवडणुकीत तटकरे यांचा जो पराभव झाला त्याला श्रीवर्धनकरच जबाबदार असल्याचे वक्तव्य केले आहे.अनेक विकास कामं करूनही श्रीवर्धनमध्ये अलिबागच्या तुलनेत कमी मतं पडली असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.