रायगड लोकसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी सुमत भांगे हे सत्ताधारी पक्षासाठी काम करीत असल्याने त्यांना बदलण्यात यावे अशी मागणी शेकापने केंंर्दीय निवडणूक निरीक्षक शर्मी यांच्याकडं दिलं आहे.मुख्य निवडणूक आयुक्तांनाही यासंबंधीची तक्रार इमेलने केली गेली असल्याचे शेकापच्यावतीनं सांगणयात आलं.
नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आपल्या निवडणूक अर्जात अपुरी माहिती दिल्याने त्याचा निवडणूक अर्ज अवैध ठरवा अशी मागणी शेकापचे उमेदवार रमेश कदम यांचे प्रतिनिधी जयंत पाटील यांनी काल छाननीच्या वेळेस केली होती.मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी तटकरे यांचा अर्ज स्वीकृत केला .निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय चुकीचा असल्याचा शेकापचा दावा आहे.
दरम्यान काल झालेल्या छाननीत दोन अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने आता रायगडमध्ये 15 उमेदवार मैदानात आहेत.अर्ज मागे घेण्याचा उद्याचा शे वटचा दिवस आहे.