पेण तालुक्यीतील रावे,दुष्मी,खारपाडा,जिते,दादर,डावरे,हमरापूर व बेणस येथील मतदान केंद्रं अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली असून येथे निवडणुकीच्या दिवशी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे.या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी शिवसेना नेत्या आमदार निलम गोऱ्हे यांनी निवडणूक निर्णय़ अधिकारी सुमंत भांगे यांच्याकडं केली आहे.
वरील केंद्रांवर यापुर्वी झालेल्या निवडणुकांच्या वेळेस मतदान केंद्र ताब्यात घेणे,बोगस मतदान करणे,मारामारी अशा घटना घडलेल्या आहेत.हा अनुभव लक्षात घेऊन यावेळ विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
रायगड लोकसभा मतदार संघात 2119 मतदान केंद्रं असून त्याताली 125 मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे ाजहीर करण्यात आलंलं आहे.या सर्व केंदांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचेही निवडणूक यंत्रणेतर्फे सांगण्यात आलं.दरम्यान रोहा तालुक्यातलही काही ठिकाणी मतदान केंद्र ताब्यात घेण्याचे प्रकार घडण्याची शक्यता असल्यानं तेथील किमान 25 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग व्हावे अशी मागणी शेकापतर्फे करण्यात आली आहे.