.*स्व. *पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना*
केंद्र सरकारकडून आर्थिक मदत
मुंबई : पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून पाच लाखांचे अर्थसहाय्य मिळाले आहे..
कोरोनानं बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना केंद सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमातून पाच लाख रूपयांची मदत देण्याचा निर्णय जाहीर झाला होता.. त्यानुसार संबंधित समितीच्या बैठकीत देशातील 67 पत्रकारांच्या कुटुंबियांना प़त्येकी पाच लाख रूपये मंजूर करण्यात आले.. महाराष्ट्रातून पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना ही रक्कम मिळाल्याचे शितल रायकर यांनी सांगितले.
केंद्र सरकारने रायकर कुटुंबियांना पाच लाखांची मदत दिली असली तरी राज्य सरकारने वारंवार आश्वासने देऊनही रायकर कुटुंबियांना कसलीच मदत केली नाही..त्याबद्दल एस.एम.देशमुख यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे..
राज्यातील जे 136 पत्रकार कोरोनाचे बळी ठरले आहेत त्यांच्या कुटुंबियांनी किंवा तातडीने केंद्र सरकारकडे मदतीसाठी अर्ज करावेत,या कुटुंबियांना तालुका पत्रकार संघांनी मदत करावी असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले आहे..