राणेंसाठी भाजपचे दरवाजेही बंद

0
859

लोकसभा निवडणुकीत पराभवामुळे राणे कमालीचे अस्वस्थ असून त्यांच्या पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. त्यामुळं राणे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र भाजप नेते एकनाथ खडसेंनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. राणेंच्या भाजप प्रवेशाचा कुठलाही प्रस्ताव नाही आणि राणेंची इच्छा असली तरीही आम्ही तो मान्य करणार नाही अशी स्पष्टोक्ती खडसेंनी दिली आहे.

 काँग्रेसमध्ये राणेंची शब्दाचा मान ठेवला जात नसल्यानं राणे वेगळा विचार करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. स्वत: राणेंनी देखील आपण मुंडेंनी भेटणार होते असं सांगितलं आहे. पण मुंडे गेल्यानंतर मात्र राणेंचा भाजप प्रवेश रेंगाळल्याचं चित्र आहे.

 त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ भाजपचीही दारं राणेंसाठी बंद झाल्याचं दिसतं आहे. त्यामुळं आता नारायण राणे आता काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here