राज ठाकरे यांनी टाइम्स नाऊचे अर्णब गोस्वामी आणि सीएनएन-आयबीएनचे राजदीप सरदेसाई याच्याशी असभ्य भाषा वापरल्यानंतर आता त्यांनी टीव्ही-9 चे विलास आठवले यांचीही “लाज ” काढली आहे.टीव्ही-9 ला मुलाखत देताना जेव्हा विलास आठवले यांनी टोल नाका आंदोलनाच्या वेळेस मांडवली झाली अशी चर्चा आहे ,हे खरंय का ? असा प्रश्न विचारला तेव्हा राज ठाकरे भडकले आणि ” तुम्हाला असे प्रश्न विचारायला लाज वाटत नाही काय”? असा प्रतिप्रश्न विचारून आठवले यांना अपमानित केले.
प्रश्न असा आहे की, राज ठाकरेंनी अपमानास्पद भाषा वापरल्यानंतर हे तीनही पत्रकार तिथं का बसले ? त्यांनी थोडा तरी स्वाभिमान दाखवून मुलाखत बंद करून बाहेर पडायला हवे होते.पत्रकार स्वाभिमान दाखवणार नाहीत तो पर्यत हे थांबणार नाही.वारंवार आणि एकापाटोपाट एक पध्दतीनं अपमानित होऊन हे सारे स्टार पत्रकार एकूणच पत्रकारितेला खाली मान घालायला लावत आहेत असं मला वाटतंय.टीआरपीच्या नादात आपण नव्या पत्रकारांसमोर कोणता आदर्श ठेवत आहोत याचा कधी तरी विचार या मंडळींनी केला पाहिजे.
.हे सारे स्टार पत्रकार याबाबत काही ठोस भूमिका घेऊ इच्छित असतील तर पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि महाराष्ट्रातील तमाम पत्रकार नक्कीच त्यांच्याबरोबर असतील.
एस एम् साहेब चैनल आणि प्रिंट मीडिया एकत्र येणार काय ?