राज ठाकरे पुन्हा जुन्याच वाटेने…

0
1166

ओवेसीं बंधूना  शिविगाळ,फडणवीसांची टिंगल-टवाळी ,भाजपवर हल्ला बोल  आणि शिवसेनेला चिमटे हे राज ठाकरे यांच्या आजच्या भाषणाचे सार.वेगळा कार्यक्रम नाही,दुष्काळग्रस्तांबद्दल नक्राश्रू जरूर काढले पण आपण त्यांच्यासाठी काही करू इच्छितो हे भाषणातून दिसले नाही, माझ्या हाती सत्ता देण्याची जुनीच टेप त्यांनी वाजविली.म्हणजे राज टाकरे यांचे भाषण अगोदरच्या कोणत्याही भाषणापेक्षा वेगळे नव्हते.खरं तर राज ठाकरे मुंबई मनपावर डोळा ठेऊन तरी भावनेच्या पलिकडे जात काही बोलतील,कार्यकर्त्यांना लोकांसाठी काही करण्याचा कार्यक्रम देतील,पक्षाच्या झालेल्या वाताहातीबद्दल आत्मपरीक्षण करतील असं वाटलं होतं मात्र यापैकी  काहीच दिसलं नाही.म्हणजे फसलेला मार्ग राज ठाकरे बदलायला तयार नाहीत हे त्यांनी दाखवून दिले आहे.मुंबईची वाट परप्रांतीयांमुळे लागली हा त्यांनी आळवलेला जुनाच सुर बहुतेकांना अमान्य आहे.मात्र मराठी मतांवर डोळा ठेऊन त्यांनी हा दावा केलाय.त्यातल्या त्यात एकच समाधानाची गोष्ट अशी की,परप्रांतीयांच्या रिक्षा जाळण्याचा आपल्या अगोदरच्या अर्धवट सोडलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी कऱण्याचा आदेश त्यांनी दिला नाही.

.ठाकरेंच्या भाषणाला लोक गर्दी करतात हे आजही दिसलं,मात्र ही गर्दी मतात परिवर्तीत करण्यात ते अपयशी ठरतात हे वारंवार दिसून आलं आहे.मतं मिळविण्यासाठी टाळ्या मिळविणारी भाषणं नाही तर लोकांचे अश्रू पुसणारी भूमिका घ्यावी लागते ती घेतली जात नाही.

आपल्या अपयशाचं खाबर पत्रकारांवर फोडण्याची, त्यांना दोष देण्याची ठाकरी परंपरा राज ठाकरे यांनी आजही जपली.मात्र त्यांनं टाळ्या मिळतात याशिवाय काहीच होत नाही.खरं तर राज ठाकरेंना आज चांगली संधी होती पण ती संधी त्यांनी घालविली “आपल्या सभेला आजही पहिल्या सारखीच गर्दी जमते” याबद्दलच्या समाधानाखेरीज राज ठाकरेंना आजच्या सभेतून काहीच साध्य करता आलेलं नाही हे  नक्की.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here