राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांची जी तोडफोड केली, त्यामुळे धास्तावलेल्या कल्याण रेल्वे पोलिसांनी राज ठाकरे यांना २००८मध्ये मंजूर झालेला जामीनही रद्द करावा असे अपील रेल्वे कोर्टात केले आहे. कोर्टाने याबाबत ठाकरे यांना नोटीस बजावली असून, १ मार्च रोजी त्यावर कल्याण रेल्वे कोर्टात सुनावणी होणार आहे.
रेल्वेची परीक्षा देण्यासाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना २००८मध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्टेशनात बेदम मारहाण केली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती.