वाई,नगर,सोलापूर येथील घटना
मुंबईः गेल्या तीन-चार दिवसात पत्रकारांवरील हल्ल्याच्या राज्यात तीन-चार घटना घडल्या आहेत.वाई आणि नगर येथील हल्ले तर पोलिसांनीच केले आहेत आणि सोलापूरमध्ये एका पत्रकारावर स्थानिक गुंडांनी जीवघेणा हल्ला केला आहे.
वाई येथील घटना संतापजनक आणि पोलिसांच्या अरेरावीचा उत्तम पुरावा म्हणून बघता येईल.वाई येथील प्रभातचे पत्रकार समीर मेंगळे बस स्थानकातील मुतारीच्या दुर्गंधीचे आणि दुर्देसेचे फोटो काढत होते.मुतारीची ही दुर्गंन्धी पीएसआय येडगे यांच्या नाकाला का झोंबली माहिती नाही.परंतू त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी समीर मेंगळे यांना बेदम मारहाण केली.काठीनं आणि पट्टयानं मारहाण केली गेली.मेंगळे वारंवार मी पत्रकार आहे,मी माझं काम करीत होते असं सांगत होते तरीही मारहाण सुरूच होती.त्यांनी मारहाण करीतच पोलीस स्थानकात आणलं गेलं.असं दिसतंय की,येगडे यांना बेंगळे यांच्याबद्दल काही तरी पूर्वग्रह असावा अन्यथा कोणतंही ठोस कारण नसताना अशी मारहाण झाली नसती.नंतर ते पत्रकार होते हे मला माहिती नव्हते असं मत त्यानी व्यक्त केलं.वाई हे गाव केवढं,तेथील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना ओळखत असतो.पोलिसांची पत्रकारांशी ओळखच नव्हती हे पटत नाही..बर ते मान्य केलं तरी सामांन्य माणूस बस स्थानकातील मुतारीचे फोटो काढू शकत नाही काय मुतारी म्हणजे संवेदनशील क्षेत्र आहे काय त्यामुळं या पत्रकाराला झालेल्या मारहाणीचा कोणताही बचाव होऊ शकत नाही.या घटनेचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तीव्र शब्दात निषेध करीत आहे.
दुसरी अशीच घटना नगरमध्ये घडली.नगर टाइम्सचे संपादक संदीप रोडे यांनाही पोलिसांनी अशीच बेदम मारहाण केली आहे.
तीसरी घटना सोलापुरची..एक व्यक्ती बेकायदेशीर कत्तलखाना चालवत असल्याची बातमी लावल्याबद्दल पंचवीस ते तीस गुंडांनी पत्रकार विजय बाबर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.गाईची कत्तल होत असल्याची बातमी दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित कत्तलखान्यावर कारवाई केली होती.त्याच्या रागातून हा हल्ला केला गेला आहे.
या तीनही घटनांचा तीव्र शब्दात धिक्कार.
पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यास सरकार टाळाटाळ करीत असल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत.सरकारनं आता पत्रकारांचा जास्त अंत न पाहता पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी एस.एम.देशमुख यांनी केली असून येत्या मार्चमध्ये त्यासाठी निर्णायक लढा उभारण्याची घोषणाही त्यांनी केली आहे,