पत्रकार संरक्षण कायदा करावा आणि राज्यातील पत्रकारांना पेन्शन योजना लागू करावी या आणि अन्य नऊ मागण्यांसाठी पत्रकार हल्ला विरोधा कृती समितीच्यावतीनं राज्यातील डीआयओ कार्यालयांना घेराव घालण्यात येणार आहे.उद्या सकाळी राज्याच्या 35 जिल्हयात हे आंदोलन होत आहे.सकाळी 11 वाजता प्रत्येक जिल्हयातील पत्रकार जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कार्यालयात जातील तेथे तीव्र स्वरूपाची निदर्शऩे केली जातील.आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार असल्याचे समितीच्या प्रसिद्दी पत्रकात नमुद कऱण्यात आले आहे.
मुंबईतही हे आंदोलन होत आहे.मुंबईतील पत्रकार दुपारी 4 वाजता मंत्रालयासमोरच्या प्रशासकीय इमारतीसमोर जमा होतील.तेथून ते माहिती महासंचालाकंच्या कार्यालयात जाऊन सरकार पत्रकारांच्या प्रश्नांकडे करीत असलेले दुर्लक्ष आणि एकूणच पत्रकारांच्या प्रश्नांंंबाबतच्या सरकारच्या उदासिन भूमिकेबद्दल आपला प्रोटेस्ट नोंदवतील.मुंंबईतील पत्रकारांनी या प्रतिकात्मक आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे करण्यात आलं आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख पुण्यातील आंदोलनात सहभागी होणार आहेत.