अखिल भारतीय तंत्रशास्त्र परिषद,वास्तुशास्त्र परिषद आणि औषधनिर्माणशास्त्र परिषद आदीच्या अखत्यारित असलेली पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालये रायगड जिल्हयातील लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्न करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.2017-18 साठी सलग्न होण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर असल्याचे विद्यापीठाच्या प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.31 जानेवारी 2014 रोजी सरकारने एका शासन निर्णयाव्दारे महाविद्यालये संलग्नीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला होता.त्यानुसार राज्यातील सर्व तंत्रशास्त्र महाविद्यालये लोणेरेच्या डॉक्टर आंबेडकर विद्यापीठाशी संलग्न करण्याच्या तसेच विद्यापीठाची चार केंद्रे आणि पाच उपकेंद्रे स्थापन करण्याच्या प्रस्तावाला वित्त विभागानेही मंजुरी दिली आहे.ः
(Visited 93 time, 1 visit today)