सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्विनी बोंद्रे-गोरे बेपत्ता प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजेश पाटील याला पनवेलच्या सत्र न्यायालयाने आज 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.जळगाव येथून अटक केलेल्या राजेश पाटीलला आज पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले होते.अश्विनी बेंद्र कळंबोली येथून बेपत्ता झालेल्या असून तेथील पोलीस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.राजेश पाटील हा माजी मंत्री आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचा भाचा आहे.2015 मध्ये ज्या दिवशी अश्विनी बेंद्रे बेपत्ता झाल्या त्या दिवशी राजेश पाटील आणि अश्विनी ब्रेंद्रे यांच्या टॉवरमध्ये केवळ तीन किलो मिटरचे अंतर होते.त्यांच्यात मोबाईल संभाषण देखील झाल्याचे तपासात पुढे आले आहे.या प्रकरणी यापुर्वीच वरिष्ठ पोलीस निरिक्षक अभय कुरूंदकर याला अटक करण्यात आलेली आहे..-