राजीव गांधी जीवनदायी योजनेत दारिद्य्र खालील पिवळी,अंत्योदय अन्न योजना,अन्नपूर्णा आणि दारिद्य्र रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबाचा लाभार्थी म्हणून समावेश केला जातो.त्यानुसार आता या शिधापत्रिकाधारक पत्रकारांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे.या योजनेनुसार पत्रकारांचा विमा हाप्ता देखील शासनाकडून भरला जाणार आहे.उर्वरित म्हणजे पांढरी शिधा धारक पत्रकारांची माहिती आरोग्य विभागाने मागितली आहे.पांढरी शिधा पत्रिका धारक पत्रकारांनी आपली माहिती माहिती आणि जनसंपर्क विभागाचे उपसंचालक यांच्याकडे सादर करावयाची आहे.
शंकाः जे सामांन्य नागरिक द्रारिद्य्र रेषेखाली जीवन जगतात त्यांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळतात.यामध्ये पत्रकार देखील आहेत.या योजनेत पत्रकारांसाठी वेगळे काय आहे ते कळत नाही.पांढरी शिधापत्रिका असलेल्या पत्रकारांनाही या योजनेचा लाभ सरकार देणार आहे काय याचा खुलासा होत नाही..