टीव्ही टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांना मैडिसन स्क्वायर गार्डन येथे झालेल्या धक्काबुक्कीचा कॉग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी निषेध केला आहे.राजदीप यांच्याबाबतीत जो प्रकार घडला त्याची मोदी मागणार आहेत काय असा सवाल सिंग यांनी केला आहे.
दरम्यान राजदीप यांनी टिट्व करून मी अगोदर कोणाच्या अंगावर गेलो नाही तर त्यांनी अगोदर मला मारहाण केली असा आरोप केलाय.मी कॅमेऱ्यासमोर काही प्रश्न विचारत असताना तयंनी माझ्याबद्दल असभ्य भाषा वापरली.त्यानंतर घटनेची आपणास हवी तशी क्लीप करून ती सर्वत्र पाठविली गेली असेही राजदीप यांनी म्हटले आहे.
राजदीप यांच्या बाबतच्या घटनेवरून पत्रकारांमध्येही दोन तट पडलेले दिसतात.अनेकांना असे वाटते की,राजदीप यांनी केवळ प्रशिध्दीसाठी हे प्रकरणा घडवून आणलं आहे.तर हा हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा असल्याचे दुसऱ्या गटाचे म्ङणणे आहे.या प्रकऱणाचा निषेध कऱण्यासाठई लखनौमध्ये पत्रकारांनी धरणे धरली.