रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पत्रकारांसहरत्नागिरीतील अनेक नागरिकांनी शासकीय रूग्णालयात येवून शनिवारी रक्तदान केले. यावेळी या मराठी पत्रकार परिषदेच्या या उपक्रमाला सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सदिच्छा भेट देवून उपक्रमाचेकौतुक केले. या रक्तदानातून ७५ रक्त पिशव्या संकलन झाल्या आहेत.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत असून विशेषत: प्रसूतीसाठी दाखल होणाऱया गरोदर मातांची संख्या अधिक आहे. मात्र सध्या रूग्णालयातील रक्त पेढीत रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होत असून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले जात आहे. त्यामुळेच सामाजिक बांधिलकीतून रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेकडून रक्तदान शिबिराचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या उपकमात पत्रकारांसह रत्नागिरीतील नागरिकांनी आवर्जुन सहभाग घेतला होता,आणि ७५ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.
रत्नागिरी शासकीय रूग्णालयात अगदी अपघातातील रूग्णांबरोबरच इतर आजारांचे रूग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. तसेच प्रसूतीसाठी शासकीय रूग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. शासकीय रूग्णालयात रक्तपेढीत रक्तसाठा प्रमाण या रूग्णांना पुरेसेनाही. त्यामुळे विविध शिबिरांच्या माध्यमातून रक्तसाठा करण्याचे प्रयत्न शासकीय रूग्णालयाकडून सुरू आहेत.तरीही रक्त तुटवडा मोठ्या पमाणात जाणवत असल्याने सामाजिक बांधिलकीतून रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने हा उपकम एक दिवसासाठी न राबवता भविष्यातही सहकार्य करण्याचा निर्णय यावेळी घेतला.
पत्रकार परिषदेकडून घेण्यात आलेल्या या उपक्रमालासहकार मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, जि.प.अध्यक्ष स्नेहा सावंत, शिवसेना जिल्हापमुख राजेंद्र महाडिक, नगराध्यक्ष राहुल पंडित, तालुका पमुख बंड्या साळवी, पंचायत समिती सभापती मेघना पाष्टे, नगरसेवक किशोर मोरे, ज्येष्ठ पत्रकार अलिमियाँ काझी आदींसह विविध क्षेत्रातील व परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
या रक्तदान शिबीरात पत्रकार, नागरिकांनी रक्तदान केले त्याचबरोबर रत्नागिरी कारागृहातील तुरूंगाधिकारी अमेय पोतदार, पोलीस कर्मचारी साक्षी चव्हाण, नगरसेवक सोहेल मुकादम, पोस्टऑफिसचे अधिकारी कुलकर्णी, अभिजीत गोडबोले, उद्योजक सौरभ मलुष्टे, मिलिंद