मुूंबईः अनेक भांडवलदारी वृत्तपत्र मालकांचा मजिठिया आयोगाच्या शिफारशींना विरोध आहे..एवढेच कश्याला अनेकांना असे वाटते की,वृत्तपत्रांसाठी वेतन आयोगाची गरजच नाही.सिमेंट इंन्डस्ट्रीत कुठं आहे वेतन आयोग ? असा प्रश्‍न हे मालक विचारत असतात.ते वृत्तपत्र उद्योग आणि सिमेंट उद्योग यामध्ये फरक समजतच नाही.शिवाय सिमेंट उद्योगाला किमान वेतन कायदा लागू आहे याचाही सोयीस्कर विसर या मालकांना पडतो.अशी भूम्किा मांडत वेतन आयोगाच्या शिफारशींना केराची टोपली दाखविणार्‍या मालकांना प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष सी.के.प्रसाद यांनी रोखठोक शब्दात फटकारले आहे.ते म्हणाले,’उत्तम पत्रकारितेला वेतन आणि नोकरीच्या संरक्षणाची हमी संस्थेच्या प्रमुखांनी द्यायलाच हवी’..ते पुढे म्हणाले,न्यूज मिडियाच्या ताळेबंदाचा अभ्यास केला असता बहुतेक माध्यमे नफ्यात सुरू असल्याचे निदर्शनास येते त्यामुळं मालकांनी योग्य वेतन दिलेच पाहिजे..कारण ‘योग्य वेतन आणि नोकरीच्या हमी शिवाय उत्तम पत्रकारिता होऊच शकत नाही’..प्रसाद यांना धन्यवाद यासाठी दिले पाहिजेत की,त्यांनी पत्रकारांची व्यथा स्पष्ट शब्दात मांडली.आज माध्यमात स्थिती अशी आहे की,बहुसंख्य पत्रकारांना किमान वेतन देखील मिळत नाही असं असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे,लोकशाही रक्षणाचे उत्तरदायीत्व पत्रकारांवर थोपून समाज पत्रकारांच्या व्यथांकडं दुर्लक्ष करीत असतो.अर्थात प्रसाद हे सारं बोलले असले तरी प्रसे कौन्शिलची अवस्था दात नसलेल्या वाघासारखी केली गेली असल्यानं यातून निष्पण्ण काहीच होणार नाही हे तेवढंच खरं.

मुंबई प्रेस क्लबच्यावतीने दरवर्षी विविध पुरस्कारांचे वितरण केले जाते.यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विल्यम मार्क यांना दिला गेला.यावेळी देशभरातील विविध 30 पत्रकारांना सन्मानित केलं गेलं.

सत्काराला उत्तर देताना विल्यम मार्क यांनी वाचकांचा विश्‍वास कायम ठेवण्यासाठी फेक न्यूजचे समूळ उच्चाटन करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं.भारतीयांनी आपल्याला स्वीकारल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी ‘न्यूज मिडियात बिझनेस आहे का’? या विषयावर परिसंवाद झाला.त्यामध्ये लोकमतचे विजय दर्डा,राघव बहल,एक्स्प्रेस ग्रुपचे अनंत गोएंका आणि समीर पाटील यांनी आपली मतं मांडली.

जग बदलण्याच्या इराध्यानं या क्षेत्रात आलेल्या पत्रकारांन मोठ्या वेतनाची अपेक्षा ठेवू नये असा संल्ला गोएंका यांनी दिला.हे विशेष .. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here