सध्याचं युग डिजिटल मिडियाचं आहे.पुढील काळात ऑनलाईन मिडियाची व्याप्ती आणि लोकप्रियताही वाढत जाणार आहे.हे लक्षात घेऊन बहुतेक वृत्तपत्रे आणि चॅनल्सनी आपल्या ऑनलाईन आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत.राज्यात असे अनेक पत्रकार आहेत की,त्यांनी एक तर यु ट्यूब चॅनल्स सुरू केलेले आहेत किंवा न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ते पत्रकारिता करताना दिसत आहेत,छोटया छोटया तालुक्यात हे पोर्टल आणि च्रॅनल्स स्थानिक बातम्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्वाचे काम करीत आहेत.अशा चॅनल्स आणि न्यूज पोर्टलची राज्यातील संख्या हजारच्या आसपास आहे.मात्र ऑनलाईन मिडियामुळं भविष्यातील धोके लक्षात येऊ लागल्याने सत्ताधार्यांनी ऑनलाईन मिडियावर काही निर्बंध आणण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत.निर्बंध कशा स्वरूपाचे असतील सांगता येणार नाही परंतू नाक दाबण्याचा प्रयत्न होणार हे नक्की आहे.अशा स्थितीत आजच सावध होणं आवश्यक आहे.त्यामुळंच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात विस्तारलेला पत्रकारांचा हा नवा वर्ग भविष्यातील प्रभावशाली घटक आहे हे लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेने या वर्गाला संघटीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे.या घटकांचे प्रश्न,त्यांच्या अडचणी समजून घेऊन एक भक्कम संघटन निर्माण करण्याच्या उद्देशानं लवकरच राज्यातील यु ट्यूब चॅनल्स आणि पोर्टल चालविणार्या पत्रत्रकारांचा एक मेळावा पुण्यात घेण्याचे नक्की झाले आहे.त्याची तारीख आणि वेळ नंतर कळविली जाणार असली तरी निमंत्रणं पाठविण्याच्या आणि व्यवस्थेच्या दृष्टीनं सोयीचं व्हावं यासाठी यु ट्यूब चॅनल्स आणि पोर्टल चालकांनी आपले फोन नंबर्स,आपल्या चॅनल्सची माहिती आणि इमेल अॅड्रेस सुनील वाळूंज यांच्या (8308393936 या फोन नंबरवर पाठवायचा आहे.परिषदेनं काळाबरोबर स्वतःमध्ये बदल करून घेतलेले आहे.उद्याची गरज विचारात घेऊन नव्या घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी परिषद उत्सुक असल्याने सर्वांना विनंती आहे की,त्यांनी परिषदेला सहकार्य करावे आणि आपल्या चॅनल्सची माहिती,पोर्टलची माहिती वरती दिलेल्या फोन नंबरवर कळवावी..
मराठी पत्रकार परिषदेतर्फे प्रकाशित