महाराष्ट्रा प्रमाणेच उत्तर प्रदेशात देखील पत्रकारांवरील हल्लयाच्या घटनांत चिंताजनक वाढ झाल्याने संतप्त झालेल्या पत्रकारांनी एकत्र येत मंगळवारी लखनौमध्ये धरणे आंदोलन केले.श्रमिक पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलन अन्य संघटनाही सहभागी झालेल्या होत्या.पत्रकार संरक्षण कायदा कऱण्याची मागणीही आंदोलक पत्रकारांनी केली आहे.
या आंदोलनात श्रमिक पत्रकार युनियन,आयएफडब्युजे,जिल्हा मान्यताप्राप्त पत्रकार संघ,आदि संघटनांनी प्रथमच एकत्र येत पत्रकारांवरील हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आणि हे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा कऱण्याची मागणी केली आहे.