महाराष्ट्रातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्लयामध्ये गेल्या दोन महिन्यात घट झाली असली तरी युपीत मात्र पत्रकरांवरील हल्ल्यामध्ये चिंताजनक वाढ झाली आहे.यादव मंत्रिंडळातील मंत्री रामगोविंद चौधरी यांचे चुलत भाऊ रामबचन यादव आणि त्याचा ड्रायव्हर धर्मेंद्रच्या विरोधात बातमी छापने बलियाचे पत्रकार संजीवकुमार सिंह यांना महागात पडले.धर्मेद्रने दुर्गापुजेच्या दिवशी सिकंदरपूर भागात मारामारी केली होती.त्याबाबतची बातमी संजीवकुमारने छापली.त्यामुळे संतापलेल्या धर्मेद्रने पत्रकारास शिविगाळ केली मारहाण केली.त्यांच्या डोक्याला हाताला जखम झाली आहे.संतापजनक गोष्ट अशी की,आरोपी मंत्र्याशी संबंधित आहेत म्हणून पत्रकाराची तक्रार ध्यायलाही पोलिस तयार नाहीत.युपीत जंगलराज सुरू आहे.