उत्तरप्रदेशमध्ये पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनांत चिंताजनक वाढ झाली असून गेल्या चार दिवसात शहाजहानपूर येथील पत्रकार जगेंद्रसिंह यांना पोलिसांनी जिवंत जाळले तर कानपूर येथील पत्रकार दीपक यांच्यावर गोळीबार करण्यात आला त्यात ते जबर जखमी झाले आहेत.या दोन्ही घटनांची चौकशी करून आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.त्यासाठी पत्रकारांनी कानपूर येथे कॅंडल माचर् काढून सरकारचा निषेध केला.तसेच जगेंद्रसिंह यांना श्रध्दांजली अपर्ण करण्यात आली.