पीटीआय आणि युएनआय या वृत्तसंस्था कधी काळी प्रत्येक वर्तमानपत्रासाठी महत्वाची भूमिका पार पाडायच्या.बातम्या मिळण्याची कोणतीही साधनं नव्हती तेव्हा बहुतेक वर्तमानपत्रांना पीटीआय आणि युएनआयच्याच बातम्यांवर अवलंबून राहावे लागत असे.या वृत्तसंस्थांची विश्वासार्हताही वादातीत होती.पीटीआय किंवा युएनआयची बातमी आहे म्हटल्यावर ती डोळेझाकून प्रसिध्द व्हायची.21मार्च ऍ961 रोजी सुरू झालेली यएनआय 1959मध्येच कंपनी म्हणून नोंदणी झाली होती..युएनआयकडे आज 325 पूर्णवेळ पत्रकार आणि 250 स्ट्रींजर आहेत.हे जगभरातील बातम्यांवर लक्ष ठेऊन असतात.वाशिंग्टन,लंडन,दुबई,इस्लामाबाद,ढाका,कोलंबो,काढमांडू,सिंगापूर आदि शहरांमधून आपले पूर्णवेळ प्रतिनिधी नेमणारी युएनआय ही पहिली न्यूज एजन्सी होती.आंदमान आणि निकोबारमध्येही युएनआयने आपला प्रतिनिधी नेमला होता.1982पासून युएनआयची युनिवार्ता नावाची हिंदी सेवाही सुरू होती.आज युएनआय हिंदी,इंग्रजी आणि उर्दु भाषेतून आपल्या ग्राहकाना सेवा देते.देश विदेशात युएनआयचे एक हजारपेक्षा जास्त ग्राहक आहेत.
हे सारं ठिक असलं तरी आता काळ बदललाय.बातम्या मिळविण्याचे अनेक श्रोत उपलब्ध झाल्याने अनेक जिल्हा आणि विभागीय वर्तमानपत्रांंंनी आपल्या कार्यलयातील पीटीआय आणि युएनआयची सेवा खंडित केली आहे.त्यामुळे युएनआय समोर आर्थिक संकट उभे राहिले असून वर्तमानपत्रांचा आत्मा असलेली युएनआय आर्थिक संकटात सापडली आहे.बातमी अशी आहे की,गेल्या आठ महिन्यापंासून य़ुएनआयला आपल्या कर्मचाऱ्यांचा पगारही देता आलेला नाही.त्यामुळे डबघाईस आलेल्या युएनआयला वाचविण्यासाठी चेअरमन विश्वास त्रिपाठी यांनी काल आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक निवेदन प्रशिध्द केले असून युएनआयसाठी सर्वांच्या मदतीची गरज असल्याचे म्हटले आहे.युएनआयच्या गेल्या तीव वर्षातला घाटा 23.67 कोटी रूपयांचा असल्याचे अध्यक्षांचे म्हणणे आहे.या आर्थिक संकटातून युएनआय कसा मार्ग काढते हे आता बघायचे.मात्र अनेक वर्षे युएनआयच्या बातम्यांशी जोडल्या गेलेल्या पत्रकारांन युएनआय वाचली पाहिजे असेच वाटणार यात शंकाच नाही.