नरेंद्र मोदींसारख्या एका व्यक्तीच्या हाती सत्ता देणे हे देशासाठी धोकादायक ठरेल ,सत्तेचा गैरवापर करीत ते भारताला हिटलरशाहीकडं घेऊन जातील त्यामुळं मोदी आणि भारतीय जनता पक्षासारख्या जातीयवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवा असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय.
मावळ लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार राहूल नार्वेकर याच्या प्रचाराची सभा काल रात्री पनवेलनजिक कामोठे इथं घेण्यात आली.त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी एनडीएवर चौफेर हल्ला केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते
नेरंद्र मोदी हे हुकूमशहा असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.नरेंद्र मोदी गुजरातच्या विकासाचे खोटे चित्र रंगवत आहेत.प्रत्यक्षात गुजरातपेक्षा 11 पटीने महाराष्ट्राचा जास्त विकास झाला आहे.याबाबत आमच्यासमोर येऊन मोदींनी चर्चा करावी असं आव्हानही मुख्यमंत्र्यांनी यावेळी मोदींना दिलं.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते डीपी त्रिपाठी आणि अन्य नेते उपस्थित होते.