मोदींचे तु़कडे करण्याची धमकी

    0
    812

    भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आता काँग्रेसच्या एका उमेदवाराने थेट हत्येचीच धमकी दिली आहे. ‘उत्तर प्रदेशातून निवडणूक लढणाऱ्या मोदीच्या विरोधात लढून त्याला चांगलाच धडा शिकवणार, त्याचे तुकडे-तुकडे करून टाकणार,’ असे भयंकर वक्तव्य काँग्रेसचे उमेदवार इमरान मसून यांनी केले आहे.

    इमरान मसूद हे काँग्रेसचे सहारणपूर येथील उमेदवार आहेत. त्यांचे एक वादग्रस्त भाषण व्हीडिओ कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यात ते मुस्लिम समुदायाला मोदींच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. ‘यूपीतून निवडणूक लढणाऱ्या मोदीला माहीत नाही की हा उत्तर प्रदेश आहे, गुजरात नाही. गुजरातमध्ये फक्त ४ टक्के मुसलमान आहेत. पण इथे २२ टक्के मुसलमान आहेत. मी त्याच्याविरोधात निवडणूक लढणार आहे. त्याला जशास तसे उत्तर कसे द्यायचे हे मला माहीत आहे,’ असे मसूद महाशय या भाषणात म्हणतात. मसूद यांनी आपल्या भाषणात मोदींवर शिव्यांचा भडीमारही केला आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here