मुरूडचा जंजिरा पर्यटकांसाठी बंद
जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची ने-आण करणार्या दोन सोसायट्यांच्या वादाने गंभीर वळण घेतल्यानं महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाला राजपुरी जेटी ते जंजिरा किल्ला या मार्गावरील जलवाहतूक बंद करावी लागली आहे.त्यामुळं ऐन सुटीच्या काळात मुरूडचा प्रसिध्द जंजिरा पाहण्यासाठी येणार्या असंख्य पर्यटकांचा हिरमोड होत आहे.मेरिटाईम बोर्डाने काल हा निर्णय घेतला आहे.राजपुरी जेटी ते जंजिरा या मार्गावर वर्षानुवर्षे शिडाच्या बोटीतून प्रवाशांची ने-आण केली जात होती.मात्र आता इंधनावर चालणार्या बोटीला या मार्गावर प्रवासी वाहतूक परवानगी दिली गेल्याने जंजिरा पर्यटक सोसायटी आणि नव्याने आलेल्या वेलकम सोसायटीत वाद सुरू झाला.त्यातून परिसरात मोठा तणाव निमार्र्ण झाल्याने मेरिटाइम बोर्डाने जंजिर्याकडं जाणार्या मार्गावरील जलवाहतूकच पूर्णपणे बंद केली आहे.त्यामुळं येणार्या पर्यटांना जंजिरा पाहण्यापासून मुकावे लागते आहे.हा वाद आता कसा सोडविला जातो याकडे सर्वाचे लक्ष आहे.