पत्रकार संरक्षण कायद्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती गेली पाच सहा वर्षे लढते आहे.अनेक आंदोलनं केली,अनेकदा त्या त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो.मात्र कायद्याचा पाळणा काही पुढं हालला नाही.अशोक चव्हाण यांच्या काळात कायद्याचा मसुदा जरूर तयार झाला पण तो सरकारी दप्तरी तसाच पडून राहिला.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सुरूवातीपासूनच सकारात्मक दृष्टाीकोन ठेवला.काल त्याच्याशी चर्चा करताना देखील त्यानी एका महिन्यात पत्रकारांचे सारे प्रश्न मार्गी लावण्याची भूमिका घेतली.अधिकार्यांना कॅमेर्यासमोर तसे आदेश दिले आहेत.पत्रकारांना असा अनुभव पहिल्यादाच येत होता.आता एक महिना वाट पाहायला हरकत नाही.पत्रकार कायदा करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र असेल असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याने आम्ही नक्कीच समाधानी आहोत.मुख्यमंत्र्यांना मनापासून धन्यवाद