मुंबईः महाराष्ट्रातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाटी शिवशाहीमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना धन्ववाद दिले आहेत.मराठी पत्रकार परिषदेने ही मागणी घेऊन सरकारकडं पाठपुरावा केला होता.
शिवशाही गाडया आल्यानंतर बहुतेक मार्गावरील एशियाड गाडया बंद झाल्या होत्या.एशियाडमधून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मोफत प्रवासाची सवलत मिळत होती.मात्र या गाडया बंद झाल्यानं अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना केवळ एस.टी.च्या लाल गाडीतूनच प्रवासाची सवलत सुरू होती.त्यामुळं पत्रकारांची मोठी गैरसोय होऊ लागली होती.पत्रकारांमध्ये त्यावरून नाराजीही होती.पत्रकारांच्या या भावना लक्षात घेऊन एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मराठी पत्रकार परिषदेच्या एका शिष्टमंडळाने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची 16 मे 2018 रोजी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.त्यानंतरही या मागणीचा सातत्यानं पाठपुरावा केला गेला होता.मुख्यमंत्र्यांकडंही या संबंधीचा आग्रह धरण्यात आला होता.उभयतांनी वेळोवेळी आश्‍वासनंही दिली होती.त्यानंतर आज दिवाकर रावते यांनी आज अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाठी शिवशाहीतून मोफत प्रवासाची घोषणा केली आहे.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक,अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,कार्याध्यक्ष गजानन नाईक,सरचिटणीस अनिल महाजन,कोषाध्यक्ष शरद पाबळे, लातूर विभागाीय सचिव विजय जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे एका पत्रकाव्दारे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here