अपघातात 3 ठार 8 जखमी

0
858

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर आज सकाळी साडेआठच्या सुमारास टॅाली,ट्रक आणि दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले असून अन्य आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.आणखी एक जण कारमध्ये अडकल्याचे सांगण्यात येते.जखमींना पनवेलच्या रूग्णालायत हलविण्यात आले आहे.पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या लेनवर खालापूर फुडमॅालच्या जवळ हा अपघात झाल्याचे खोपोली पोलिसांनी सांगितले.अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.पोलिस घटनास्थळी रवाना झाली आहेत.या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या लेनवरील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.वाहतूक सुरळीत व्हायला किमान अकरा वाजतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here